टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातील महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पिटल आता मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने आपली सेवा देत आहे.
सन 2005 पासून ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या सेवा देणाऱ्या या हॉस्पिटलने covid-19 च्यामारी च्या काळात प्रचंड जनसेवा केली होती.
अत्यंत अल्प दरामध्ये जेव्हा इतरत्र कुठेही रुग्णांसाठी ऍडमिशन मिळत नव्हते त्या काळामध्ये 286 पेक्षा जास्त रुग्णांना मंगळवेढ्याच्या या रुग्णालयामध्ये सर्वोत्तम सेवा दिल हे सर्वांना माहीत आहे.
कमी शुल्क आकारून शेकडो लोकांचे प्राण हॉस्पिटलने वाचलेले
शासकीय दरात बिलाची आकारणी करून प्रसंगी त्यापेक्षाही कमी शुल्क आकारून शेकडो लोकांचे प्राण या काळामध्ये या हॉस्पिटल ने वाचलेले आहेत. त्याचबरोबर याच काळामध्ये प्रसूतीच्या व सिजर यांच्या सेवा निशुल्क देऊन शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 3000 प्रसूती मातांना मोफत सेवा दिलेली आहे.
यामुळे या रुग्णालयाचे नाव मंगळवेढा तालुका बरोबरच सांगोला, जत ,मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर याबरोबर जिल्ह्याबाहेरील परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असलेले आहे.
निशुल्क व योजनेशिवाय अत्यंत अल्प दरात
आज हे रुग्णालय एकाच छताखाली विविध प्रकारच्या आरोग्य सेवा योजनेमध्ये निशुल्क व योजनेशिवाय अत्यंत अल्प दरात देत आहे.
विविध प्रकारच्या क्षेत्रात आरोग्य सेवा पुरवत आहे
या हॉस्पिटलमध्ये सध्या यूरोलॉजी , आर्थोपेडिक, पीडियाट्रिक , नेफरोलॉजी, कार्डिओलॉजी , जनरल मेडिसिन , जनरल सर्जरी , त्वचारोग, छाती व फुफ्फुसाचे आजार, न्यूरोलॉजी , हीमेटलॉजी या विविध प्रकारच्या क्षेत्रात आरोग्य सेवा पुरवत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान
या रुग्णालयांमध्ये सोळा स्लाईस ची उत्कृष्ट दर्जाची सिटीस्कॅन मशिन, डिजिटल एक्स-रे, फिजिओथेरपी युनिट , अँजिओग्राफी- अँजिओप्लास्टी ची मशीन , डायबिटीस रुग्णांमधील नसांच्या तपासणीसाठी न्यूरो टच नावाची मशीन, टू डी इको कार्डिओ ग्राफी मशीन, ट्रेडमिल टेस्ट मशीन, लेझर लिथोट्रिप्सी मशीन, सीआर्म, व्हेंटिलेटर सिपेप व बाय पेप मशीन सह विविध रोगांच्या साठी लागणारे मॉनिटर्स, सुसज्ज आयसीयू ,सुसज्ज एन आय सी यु अशा विविध उपकरणांच्या आधारे सेवा देत आहे.
अशा प्रकारचे सर्व सेवा देणारे महिला हॉस्पिटल आता मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी नावाने कार्यरत राहणार आहे.
दर्जेदार सेवा अत्यंत कमी शुल्कामध्ये
मंगळवेढा सारख्या एका लहान तालुक्यामध्ये व ग्रामीण भागातील उपेक्षित जनतेला आरोग्याच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत दर्जेदार सेवा अत्यंत कमी शुल्कामध्ये तत्परतेने देण्यासाठी हे रुग्णालय सज्ज झालेले आहे.
सुसज्ज आय सी यु , कार्डियाक आयसीयू व मेडिसिन विभाग-
डॉ.विलास तोंडे पाटील यांनी मेडिसिन विभागामध्ये एमडी व डी एन बी ची पदवी प्राप्त केलेली असून अपोलो हॉस्पिटल सारख्या अतिशय उच्च दर्जाच्या कार्डियाक विभागात त्यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. टू डी इको, ट्रेडमिल टेस्ट, ईसीजी सारख्या सर्वोत्तम सेवा त्यांच्यामुळेच मंगळवेढे.कराना आता या रुग्णात मिळणार आहेत.
तसेच सर्पदंश विंचू दंश विषबाधा, लिव्हरचेआजार ,पोटात पाणी होणे ,छातीत पाणी होणे , मलेरिया ,डेंग्यू , मेंदूचे ताप, झटके येणे, पक्षाघात , मेंदूतील रक्तस्त्राव, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब ,छातीत दुखणे, धाप लागणे अशा तक्रारी असणाऱ्या रुग्णांना आता चांगली सेवा उपलब्ध होत आहे.
यामधील बऱ्याच गोष्टी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच विविध कॅशलेस सेवा देणार्या कंपन्यांच्या योजनांच्या अंतर्गत मोफत सेवा मिळत आहे.
मधुमेह हा तर डॉ. विलास तोंडे पाटील यांचा अत्यंत आवडीचा विषय असून अनेक लोकांना अत्यंत आधुनिक तपासण्या व उपचार ते करीत आहेत. डायबिटीस रिवरसल प्रोग्राम या रुग्णालयांमध्ये ते राबवत असून या कार्यक्रमांतर्गत नुकतेच डायबिटीस झालेल्या रुग्णांना आहार-विहार याबाबत मार्गदर्शन करून अत्यंत अचूक व नेमका उपचार बनवून देतात.
त्यामध्ये मधुमेहाचे रुग्ण पूर्ववत होण्याचे प्रमाण जास्त आहे . ज्या रुग्णांना अनेक दिवसापासून मधुमेहाचा त्रास आहे , त्यांच्याकरिता अत्यंत सुलभ रीत्या मधुमेहाचे नियंत्रण करणे हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. मधुमेहा विषयांमध्ये त्यांना खास फेलोशिप प्राप्त आहे.
बालरोग विभाग –
या विभागांमध्ये डॉ.महेश कोनळळी गेल्या दीड वर्षापासून अत्यंत चांगल्या दर्जाची सेवा बालकांच्या बाबतीत देत आहेत नवजात बालकांच्या साठी खास करून नवजात बालकांचे अतिदक्षता विभाग म्हणजे एन आय सी यु त्यांनी सुरू केलेली आहे.
महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजना अंतर्गत अनेक बालकांना दाखल करून त्यांना मोफत सेवा दिली असल्याने मंगळवेढा परिसरातील अनेक रुग्णांचे हजार रुपये वाचले आहेत.
शासकीय लसीकरण या व्यतिरिक्त बऱ्याच आजारावर लसीकरण या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे लहान बालकांच्या साठी प्रशस्त वार्ड व परिसरामध्ये मनोरंजना करीता अनेक खेळणी व उपकरणे आहेत.
यूरोलॉजी विभाग-
या विभागांमध्ये डॉ.स्वप्नील बोबडे पुणे हे डॉक्टर दर शनिवारी व रविवारी या दोन दिवसांमध्ये प्रोस्टेट चे आजार प्रोस्टेट च्याच्या कॅन्सरचे निदान. मूत्राशयातील, मूत्रनलिकेतील, किडनीतील खडे, किडनीचे आजार वगैरे करिता दुर्बिणीतून आणि अनेक वेळा लेझर उपचाराद्वारे उत्तम प्रकारची सेवा देत आहे.
विशेष म्हणजे या विभागातील जास्तीत जास्त रुपये योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सेवा घेत आहेत. पिवळे आणि केसरी रंगाचे रेशन कार्ड असणारे सर्व लाभार्थी या योजनेस पात्र आहेत. त्यांच्या मदतीला डॉक्टर दत्तात्रेय घोडके हे सोनोग्राफीचा सेवा देत आहेत.
वयस्कर पुरुषांच्या कडे आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये दुर्लक्ष होण्याचे प्रमाण जास्त असून असे रुग्ण आपल्या तक्रारी लाजून किंवा अज्ञानापोटी घरातील इतर व्यक्तींना सांगत नसतात त्यामुळे अनेक वेळा या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीची होणारी वाढ ही कधीकधी कॅन्सर मध्ये रुपांतरीत होत असते,
याचे ज्ञान त्याला नसते त्यामुळे लघवीची धार कमी होत असल्यास लघवी झाल्यानंतर लघवी शिल्लक राहिली आहे असे वाटत असल्यास किंवा लघवी थोडी थोडी होत असल्यास किंवा लघवीतून रक्त येत असल्यास किंवा सजविला दूर करावा लागत असल्यास अशा पुरुष रुग्णाने लवकरात लवकर प्रॉस्टेट ग्रंथी बाबत तपासणी करून घ्यावी.
या रुग्णालयांमध्ये लघवीचा असा अभ्यास करण्याकरिता युरोफ्लो मीटर उपलब्ध आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्या वगैरे वेळीच केल्यास लवकर निदान झाल्यास त्याचा नक्की फायदा होऊ शकतो.
कार्डियाक आयसीयू व कार्डिओलॉजी विभाग-
या विभागांमध्ये डॉ.दीपक गायकवाड, डॉ.प्रमोद पवार, डॉ.सुनील शेवाळे, डॉ.अमजद सय्यद, डॉ.सिद्धांत गांधी अशा तज्ञ कार्डिओलॉजिस्ट यांचे एक पॅनल तयार करण्यात आले असून, उपलब्धतेनुसार बाह्यरुग्ण विभाग व अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीच्या सेवा कार्डिओलॉजिस्ट देत आहेत.
कार्डियाक युनिटमध्ये उच्च दर्जाचे कार्डियाक आयसीयू,अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करिताचे मशीन, डी फॅब्रीलेटर, टेम्पररी पेसमेकर उपलब्ध असून हार्ट अटॅक आल्यानंतर लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्याकडे लोकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे व हृदयाच्यासंदर्भातील महत्त्वाची तपासणी म्हणून ऍन्जिओग्राफीची सोय केवळ 3 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
जर अशा रुग्णांना काही दोष निघाल्यास केशरी व पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डधारकांना मोफत अँजिओप्लास्टी करून मिळणार आहे. तसेच स्टार हेल्थ सारख्या कॅशलेस सुद्धा या रुग्णालयांमध्ये आता उपलब्ध आहे.
नेफरोलॉजी विभाग-
या विभागांमध्ये डॉ.पिलगुलवार यांचे मार्गदर्शनाखाली डायलिसिसच्या दोन अद्ययावत मशीन्स उपलब्ध असून सर्वच्या सर्व रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत येत आहेत.
मूत्रपिंडाचे कार्य बंद झाल्याने जीवनाला त्रस्त झालेल्या या रुग्णांच्या जीवनामध्ये या रुग्णालयाने आपल्या जवळच्या भागामध्ये व योजनेमध्ये मोफत ही सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे दिलासा मिळाल्याचे मनोगत अनेक रुग्णांनी व्यक्त केले आहे.
अस्थिरोग विभाग-
या विभागांमध्ये डॉ.अमित गुंडेवार हे अस्थिरोग तज्ञ दर सोमवारी व गुरुवारी विविध प्रकारचे फॅक्चर, हाडांचे आजार मणक्याचे आजार गुडघ्याचे आजार यावर तपासण्या करून उपचार करीत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत हाडाचे फॅक्चर झाल्यानंतर, अपघातानंतर, पाठीच्या मणक्याचे, गुडघ्याचे, अनेक सांध्यांचे विकार यावर उपचार देत आहेत त्यांच्यासोबत फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ.नवत्रे अनेक रुग्णांना फिजोथेरपी देण्याचे काम करीत आहेत.
वरील सेवांच्या सोबत या रुग्णालयांमध्ये ब्लड स्टोरेज युनिट मध्ये सर्व प्रकारचे ब्लड ,प्लाजमा, पीसी व्ही 24 तास तत्परतेने उपलब्ध करून पुरवण्याचे काम श्री.दशरथ फरकांडे करीत आहेत.
छातीचे व दम्याच्या आजाराकरिता डॉ.सीमा इंगोले पाटील, वयस्कर रुग्णांच्या आजाराकरिता जेरीयट्रिक मेडिसिन ची पदवी प्राप्त असलेले डॉ.श्रीराज काणे, त्वचारोग विभागांमध्ये डॉ. श्वेता होले पाटील मॅडम चांगल्या दर्जाची सेवा देत आहेत.
विविध शस्त्रक्रियांच्या साठी लागणाऱ्या भूलतज्ञांच्या सेवा डॉ.श्रीनिवास कोरुलकर, डॉ. अमित कांबळे , डॉ. दीपा गुंडेवार ते देत आहेत. महिन्यातून एक वेळा रक्त रोग तज्ञ डॉक्टर नेमाने सेवा देत आहेत.
तसेच, डॉ.स्वानंद रेडेकर हे गॅस्ट्रो सर्जन म्हणून सेवा देत आहेत. हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स आतड्याचे विविध आजार दुर्बिणीतून विविध शस्त्रक्रिया बाबत या रुग्णालयाचा लौकिक वाढत आहे.
या रुग्णालयाचे पूर्वीचे नाव महिला हॉस्पिटल असे होते आणि खरोखरच महिलांच्या आरोग्य सेवेमध्ये डॉ.पुष्पांजली शिंदे यांनी प्रचंड काम केले असून, अतिशय उच्च दर्जाची सेवा तत्परतेने आणि कमी शुल्कात 2005 सालापासून मंगळवेढा व परिसरातील महिलांना दिल्यामुळे महिला हॉस्पिटलचे नाव सार्थ ठरले होते.
याच रुग्णालयामध्ये आता विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध झाले असल्याने, लोकांच्या माहिती करिता, गैरसमज टाळण्याकरिता, महिला हॉस्पिटलचे नाव अधिकृत रित्या मंगळवेढा मल्टीस्पेशालिटीहॉस्पिटल असे झालेले असून भविष्यामध्ये मंगळवेढेकरांसाठी आरोग्य सेवेतील उत्तम सेवा देणारी पर्यायी संस्था म्हणून सिद्ध होईल यात शंका नाही.
शब्दांकन- श्री.समरेश कुलकर्णी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज