टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आरोपी संतोष रामचंद्र यादव, भारत रामचंद्र यादव यांची विनयभंग व मारहाणीच्या गुन्हयातून मंगळवेढा येथील फौजदारी न्यायाधिश गंगवाल यांनी आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता करणेबाबतचे आदेश केलेले आहेत.
नंदूर ता.मंगळवेढा येथील फिर्यादी सिंधूताई अर्जुन पवार हिने आरोपी संतोष रामचंद्र यादव, भारत रामचंद्र यादव, सिध्दू यादव व वैशाली यादव रा.नंदूर यांचेविरुध्द
भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४ , ३२६ , ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे फिर्यादी हीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीस झोंबाझोंबी केली व फिर्यादीचे पती भांडण सोडविण्याकरिता आले असता लोखंडी गजाने मारुन जखमी केले अशा आशयाची फिर्याद दाखल केलेली होती.
सदर फिर्याद दाखल झालेनंतर यातील आरोपी संतोष रामचंद्र यादव, भारत रामचंद्र यादव यांना मंगळवेढा पोलीस स्टेशन यांनी दि.२१ ऑगस्ट रोजी अटक केली.
त्यानंतर वरील आरोपींना मे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना ६ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. त्यानंतर दिनांक २९ ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.
आरोपीस जामीन मिळणेकरिता न्यायालयाकडे अर्ज ठेवण्यात आला होता. यापूर्वी यातील आरोपी यांनी फिर्यादीचे पतीवर मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आरोपींना मारहाण केल्यामुळे व महिलेचा विनयभंग केल्यामुळे फिर्यादीचे पतीविरुध्द विनयभंगाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला होता.
त्याचाच राग मनात धरुन यातील फिर्यादी सिंधूताई पवार यांनी तिचे पतीचे सांगणेवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला.
आरोपीना अटक करुन मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे व इतर मुददयांवर युक्तीवाद आरोपीचे वकील यांनी केला.
आरोपीचे वकील , पोलीस तपास अधिकारी व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकून व आरोपीतर्फे अॅड . प्रकाश घुले यांनी केलेला युक्तीवाद मान्य करुन मंगळवेढा येथील मे. फौजदारी न्यायाधिश मे . गंगवाल सो यांनी आरोपीची जामीनावर मूक्तता करणेबाबत आदेश करण्यात आले.
सदर जामीन अर्जाचे कामकाज आरोपीतर्फे अॅड . प्रकाश घुले व अॅड . बापूसाहेब यादव यांनी पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज