टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा मोठा उत्साह आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या संकल्पनेतलं हर घर तिरंगा अभियान राबवलं जात आहे. अशातच मंगळवेढा शहरात तालुक्यातील ग्रामीण भागात पालात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या झोपड्यांवर तिरंगा फडकवल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील मरीआई वाले कुटुंब व पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या झोपडीत पिढ्यान पिढ्या पालामध्ये राहते त्यांनी तिरंगा लावून त्यांचे राष्ट्रप्रेम व देशाभिमान व्यक्त केला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी हे नागरिक दाखल झाले आहेत. अमृत महोत्सवाचा उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या पालावर तिरंगा फडकवला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ६० हजारांहून अधिक घरांवर तिरंगा डौलाने फडकत असून वाड्या, वस्त्यांवरील झोपड्यावरही तिरंगा दिसत आहे.
तालुक्यातील नागरिकांनी आपल्या घरावरासह दुकानाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला आहे; मात्र हा झेंडा फडकवताना त्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबतची जागृती देखील केली जात आहे.
राष्ट्रप्रेम जागृत ठेवताना राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली नियमावली, रिक्षावर लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सांगत आहेत.
आकाशाच्या दिशेने सरळ दिशेत झेंडे लावणे, डाग लागलेले झेंडे फडकवू नयेत, अशी माहिती देताना झेंड्याची आणि त्यामधील रंगाची माहितीदेखील नागरिकांना दिली जात आहे.
मंगळवेढ्यातील काही नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी घरांना व बाजारपेठेतील दुकानदारांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज