टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील फियार्दीस दिलेला चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी ठेकेदार शत्रुघ्न दामोदर कोंडूभैरी याला मंगळवेढ्याच्या प्रथम वर्ग न्यायधिश एस.एन.गंगवाल-शहा यांनी 8 महिने कारावास व नुकसान भरपाई तसेच ती न दिल्यास पुन्हा 6 महिने तुरूंगवास अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिगंबर दगडू भगरे यांनी ओळखीचे असलेले शत्रूघ्न कोंडुभैरी यांना वाहन खरेदी साठी 4 लाख रुपये उसने दिले होते.
रक्कम परत परत देण्याची मुदत संपल्यानंतर त्यारकमेची मागणी केली असता आरोपी शत्रूघ्न कोंडुभैरी यांने 50 हजार रुपये रोख दिले
व 3 लाख 50 हजारांचा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मंगळवेढाचा दि.10/10/2017 तारखेचा चेक फिर्यादिस दिला.
सदरचा चेक वटणेसाठी बँकेत भरला असता खातेवर पुरेशी रक्कम शिल्लक नाही असा शेरा मारून चेक न वटता परत आला.
तेंव्हा फिर्यादीने यांनी अॅड.सुजय लवटे यांचेमार्फत नोटीस पाठवूनही आरोपीने पैसे परत केले नाहीत, तेंव्हा निगोशिऐबल इन्स्ट्रुमेंट अॅॅक्ट 138 प्रमाणे मंगळवेढा कोर्टात फिर्याद दाखल केली.
सदर केसमध्ये फिर्यादीने पैसे दिल्याचे शाबीत केले. पुरावेअंती फिर्यादीने आपली केस विनात्रुटी शाबीत केलेचा युक्तिवाद अॅड. सुजय लवटे यांनी केला. त्यानंतर कोर्टाने फिर्यादीचा युक्तिवाद ग्राह्य धरून
आरोपी शत्रूघ्न कोंडुभैरी याला दि.28/3/2023 रोजी 8 महिने तुरुंगवास, 3,50,000 नुकसान भरपाई तसेच 75,000 रु खर्च देणेची व रक्कम न दिलेस 6 महिने पुन्हा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली.
यात फिर्यादी दिगंबर भगरे यांचेमार्फत अॅड.सुजय तुकाराम लवटे तर आरोपी शत्रूघ्न कोंडुभैरी तर्फे अॅड.मनीष दिलीप मर्दा यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज