टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर , संत दामाजी नगर ग्रामपंचायत संत चोखामेळा ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांना व व्यवसायिकांनाची आज दि.१५ मे पासून किराणा दुकान व शेतीविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ उघडी राहतील.
भाजीपाला व फळे ७ ते ११ या वेळात फिरून विकायची आहेत. दूध विक्री सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उघडी राहतील. मेडिकल व दवाखाने यांना वेळेचे बंधन असणार नाही असे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी कळविले आहे.
‘हे’ नियम पाळावे लागणार
विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये. सर्वांनी मास्कचा वापर करावा. नागरिकांनी ही दुकानासमोर गर्दी करू नये. सुरक्षित अंतर पाळावे. किराणा दुकान व मेडिकल यांना विनंती की आपल्या दुकानासमोर किंवा दुकानात होणारी गर्दीचे नियोजन करावे.
गोल सर्कल आखावे, सावली करावी. आता पर्यंत आपण सर्वांनी कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर पणे नियमांचे पालन केले आहे त्यामुळे कोरोना कंट्रोल मध्ये आहे.
यापुढे ही आपण नियमांचे पालन करावे.जे दुकान मालक कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणार नाहीत त्यांचे दुकान यापुढे सील केले जाईल.असा इशाराही साळुंखे यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज