mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दोन तासाच्या आत अपहरणकर्ते चारचाकी गाडीसह जेरबंद; ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे मंगळवेढा व सांगोला पोलिसांना आले यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 16, 2021
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स। 

अपहरण घटनेबाबत माहिती समजताच
मंगळवेढा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून अपहरणकर्तेबाबत माहिती कळविताच दोन तासाच्या आत अपहरणकर्तेना चारचाकी गाडीसह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतुन बसविण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सतर्कतेने अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे.

सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागातुन एका व्यक्तीस चारचाकी गाडीतून अपहरणाची घटना घडली. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ अपहरणकर्त्यांच्या बलेनो कार विषयी माहिती व वर्णन ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे 18002703600 या क्रमांकावर परिसरातील नागरिकांना दिली.

सदरचा कॉल मंगळवेढा व सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांच्या तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर प्रसारित झाला.

दरम्यान पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे हे आपल्या सहकाऱ्यांसह मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढावरून सांगोला तालुक्याच्या दिशेने निघाले होते.

त्याचवेळी या मार्गाकडे जाणाऱ्या काही नागरिकानी हा संदेश ऐकला आणि संदेशात ऐकल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वर्णनाची कार भिकारअकोले या गावाजवळ नागरिकांनी रस्त्यावर येऊन अडवण्याचा प्रयत्न केल्याने अपहरणकर्ते जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलास यश आले.

या कारमध्ये तिघेजण होते यातील एकजण पळून गेला होता. त्याला दामाजी चौकात पकडण्यात आले. दरम्यान एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतुन काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यात सदर अत्याधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तासाच्या आत अपहरणकर्तेना जेरबंद करण्यात मंगळवेढा व सांगोला पोलिसांना यश आले आहे. (स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामसुरक्षा दल

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

April 5, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
Next Post
टी-20 वर्ल्डकपचा थरार आजपासून; पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

टी-20 वर्ल्डकपचा थरार आजपासून; पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

April 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..