टीम मंगळवेढा टाईम्स।
लमाणतांडा येथील सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे तोडणाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या आंदोलनकत्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू होते.
लमाणतांडा येथील सांस्कृतिक भवनावर अतिक्रमण करून तीन मजली इमारत बांधल्याप्रकरणी प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही कारवाई न केल्याबद्दल
अजय पांडुरंग राठोड व इतर ग्रामस्थांनी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी चौकशी करुन सदरची इमारत सील केली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी या इमारतीचे सील अज्ञात व्यक्तीकडून तोडण्यात आले.
त्यानंतर प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे. याची दखल घेऊन मंगळवारी लमाणतांडा येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, तरीही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व बालाजी नगर येथील ग्रामस्थ
यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे, जोपर्यंत त्या सील तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही किंवा त्यांना अटक होत नाही,
तोपर्यंत उपोषण सुरूच राहील व नंदेश्वर येथील अतिक्रमण काढावे एकाचे काढू नये यासाठी जोपर्यंत अतिक्रमण सरसकट काढत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका सिधराया माळी, अजय राठोड यांनी घेतली आहे.
चौकशीनंतर कारवाई : याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे,
ग्रामपंचायतीने पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, संपूर्ण चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल. किरण मोरे, प्रभारी गटविकास अधिकारी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज