टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाच हजाराची लाच घेणारा मंडलाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवेढा पोलीस ठाण्यात सुरू आहे.
चंद्रकांत इंगोले, मंडल अधिकारी मारापुर तालुका मंगळवेढा असे अँटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
तक्रारदार यांनी जमीन बक्षीस पत्र करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता तेव्हा मंडल अधिकारी इंगोले यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. पाच हजार रुपये देताना संत दामाजी साखर कारखाना रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने इंगोले यांना रंगेहात पकडले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज