मंगळवेढा टाईम्स न्युज ।
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत (EVM) महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप केला जात आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत मारकडवाडी गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज मारकडवाडी गावाला दाखल झाले.
यावेळी जाहीर सभेतून आमदार उत्तम जानकर यांनी मोठं वक्तव्य केले. माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची आहे. मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या, असे त्यांनी म्हटले.
उत्तम जानकर म्हणाले की, आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोकं मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवाशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी याबाबत माहिती घ्यायला गावात प्रतिनिधी पाठवले होते. माझ्या शपथेपेक्षा येथील लढाई महत्त्वाची आहे. मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
…तर राजीनामा देणार
ते पुढे म्हणाले की, मी निवडणूक आयोगाकडे गावाचा ठराव पाठवणार आहे. मला मतदान केलेल्या 1400 ग्रामस्थांचे प्रतिज्ञा पत्र देणार आहे. लोकशाही फक्त पवार साहेबच वाचवू शकतात. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर राजीनामा देणार आहे. देशातील एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकणार नाही का? असा सवाल उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला विचारला.
माझ्यासाठी आमदारकी महत्त्वाची नाही
निवडणूक आयोगाने ऐकले नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जावू, असे देखील त्यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी आमदारकी महत्त्वाची नाही तर लोकशाही महत्त्वाची आहे. लोकसभेला येथे मोदी आणले होते, तेव्हा 64 हजार मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, मारकडवाडीत एकूण 2476 मतदान असून त्यापैकी 77 टक्के मतदान झाले. भाजपचे राम सातपुते यांना 1003 तर उत्तम जानकर यांना 843 मतदान पडलं. गेली तीन टर्म या गावातून जानकर यांनाच लीड मिळायचे. पण यावेळीच मला कमी मतदान कसं झालं असा प्रश्न जानकरांनी उपस्थित केला होता. यानंतर मारकडवाडीच्या नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती.
यासाठी आंदोलन देखील केलं होतं. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती. बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज