टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथील संगीता बंडू मेटकरी (वय 46) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बंडू दशरथ मेटकरी (वय 53), अंबादास दशरथ मेटकरी(वय 60), सुधाकर दशरथ मेटकरी(वय 54) या तीघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी नंदाबाई सुखदेव चौगुले (रा.ईश्वर वठार ता.पंढरपूर) हिची मुलगी मयत संगीता हिचे लग्न सन 1998 साली मल्लेवाडी येथील बंडू दशरथ मेटकरी यांचेबरोबर झाले होते.
तीला एक मुलगी मयुरी (वय 23) व मुलगा ओंकार (वय 19) अशी दोन अपत्ये आहेत.जावई बंडू त्यांचे लग्न झालेपासून सारखे घरगुती कारणावरून वाद करीत असत.
तुइया आई वडीलांकडून दोन लाख रुपये घेवून ये म्हणून वारंवार भांडणे करीत असल्याने तु आमच्या घरातून कायमची निघून जा असे बोलून तीला त्रास देत असत.
याबाबत मयत संगीताने तीच्या आईला तसे बोलून दाखवले होते.त्यामुळे मयत ही कायम टेन्शनखाली रहात असे. दि.12 जुलै रोजी मयत संगीताने फोन करून फिर्यादी आईस मयताने फोन करून पती गेली दोन दिवस मारहाण करीत आहेत,
तर दीर तु घरातून निघून जा असे म्हणून त्रास देवून शिवीगाळी व दमदाटी देत असल्याचे सांगितले होते.
या त्रासाला कंटाळून दि.13 जुलै रोजी राहते घरात सायंकाळी 7.30 वा.घराचे छतास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे दिलेल्या
फिर्यादीत मयताच्या आईने म्हटले आहे. तपासिक अंमलदार पोलिस नाईक विठ्ठल विभुते यांनी वरील तीघांना नुकतीच अटक केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज