टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने हमीभाव मका खरेदी केंद्राच्या ऑनलाइन नावनोंदणीला सुरुवात झाली असल्याची माहिती चेअरमन सिद्धेश्वर बबनराव अवताडे यांनी दिली.
हमीभावाच्या नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी २०२२-२३ च्या मका या पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा , आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स , मोबाइल नंबर इत्यादी कागदपत्रे जमा करून समक्ष ऑनलाइन नावनोंदणी करावी.
शासकीय हमीभाव १९६२ रुपये आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाइन नावनोंदणी मंगळवेढा तालुका सह खरेदी विक्री संघ येथे वर नमूद केलेल्या कागदपत्रासह करावी.
ऑनलाइन नावनोंदणीची अंतिम तारीख २१ ऑक्टोबरपर्यंत आहे. ऑनलाइन नावनोंदणी शिवाय शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मका विक्री करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी व्यवस्थापक शंभू नागणे ९४०५२१४५९५ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज