टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरापासून 500 मीटर अंतरावर खोमनाळ रोडवर असलेल्या मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट मध्ये खास खवय्यांसाठी ‘मैत्री मासांहारी स्पेशल थाळी’ महोत्सव सुरू केल्याची माहिती गौरीशंकर बुरकुल यांनी दिली आहे.
मैत्री श्रावण थाळीच्या घवघवीत यशानंतर सोमवार दि.20 सप्टेंबर ते बुधवार दि.6 ऑक्टोबर पर्यंत हा ‘मैत्री मासांहारी स्पेशल थाळी’ महोत्सव सुरू राहणार आहे.
नागरिकांना फक्त 220 रुपयांमध्ये मटण थाळी दिली जाणार आहे त्यासोबत मटण प्लेट ,खिमा वाटी, रोस्टेड मच्छी,अंडा बॉईल, सूप वाटी,स्पेशल मैत्री काळा रस्सा, कोशिंबीर, राईस, रोटी/चपाती/भाकरी दिली जाणार आहे.
मच्छि खवय्यांसाठी 220 रुपयांत मच्छि थाळी असून यामध्ये रोस्टेड मच्छि, मिठातील मच्छि, फ्राय मच्छि,अंडा बॉईल,मच्छि रस्सा, सूप,कोशिंबीर, राईस, रोटी/चपाती/भाकरी या पैकी एक याचा समावेश थाळी मध्ये असणार आहे.
मटण व मच्छि खवय्यांना ही जबरदस्त मेजवानी मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट यांनी आणली असून दर्जेदार गुणवत्ता असलेल्या मासांहारी थाळीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज