mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाशिवरात्री! माचणूरची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू; पाच दिवसीय यात्रेत भाविकांना विविध उपक्रमांची पर्वणी; भाविकांची मोठी गर्दी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2024
in मंगळवेढा
महाशिवरात्री! माचणूरची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू; पाच दिवसीय यात्रेत भाविकांना विविध उपक्रमांची पर्वणी; भाविकांची मोठी गर्दी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथील प्रसिद्ध श्री.सिध्देश्वर देवस्थानची पाच दिवसीय यात्रा महाशिवरात्री पासून सुरु होत असून आज पहाटे चार वाजता श्रींची शासकीय महापूजा  तहसीलदार मदन जाधव तसेच उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात आली.

महाशिवरात्रीच्या पर्वावर दरवर्षी येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातील लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळते. या दिवशी सायंकाळी श्रींच्या पालखीचे माचणूर गावातून मंदिराकडे दिवट्या, टाळ- मृदंग, वाजंत्री, बेंजो पथकासह सवाद्य मिरवणुकीने प्रस्थान होणार असून कुस्ती मैदानात नयनरम्य आतषबाजी होणार आहे.

दुसऱ्या दिवशी रात्री सात ते सकाळी उजडेपर्यंत जिल्ह्यातील एकमेव राज्यस्तरीय कलगीतुरा कार्यक्रम मारुती मंदिर चौकात रंगणार आहे. या फडात पुणे, कोल्हापूर, धाराशिव, नाशिक, नगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यातून नामांकित शाहीर आपली कला सादर करणार आहेत तसेच दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता अखिल भारतीय सिध्देश्वर केसरी कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन आ. समाधान आवताडे यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत परिचारक तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषबापू देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मल्लास बुलेट मोटारसायकल आणि मानाची गदा बक्षीस मिळणार असून पुढील क्रमांकाच्या विजेत्यांना रु. ५१०००/-, २५०००/-, ११०००/- अशी पारितोषिके ठेवलेली आहेत.

शेवटच्या पाचव्या दिवशी सायंकाळी श्रींच्या पालखीचे सिध्देश्वर मंदिरातून माचणूर गावाकडे प्रस्थान होणार असून महाप्रसादाने यात्रेची सांगता होईल.
 सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा तसेच सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष विलास डोके, सरपंच साधना डोके, उपसरपंच नितीन पाटील, सचिव समाधान डोके, संयोजक प्रकाश डोके, आयोजक राहुल डोके आदींनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: माचणूर

संबंधित बातम्या

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
Next Post
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

कामाची बातमी! शेतकऱ्यांना अवघ्या 'इतक्या' रुपयांत मिळणार वीज; निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..