mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एसटी प्रवास कालपासून महागला; तिकिटांच्या दरात इतक्या रुपयांची वाढ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 27, 2021
in राज्य
प्रवाशांनो! एस.टी बस कुठे आहे, किती वेळात येणार याची माहिती आता मोबाईलवर समजणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला असता एसटी महामंडळाने प्रवास दरात 17.17 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली.ही भाडेवाढ  (26 ऑक्टोबर) लागू होणार आहे.

करोना काळात एसटी महामंडळाला बसलेला मोठा फटका आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे तिकीट दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला अधिकचे 50 कोटी रुपये गोळा होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, “कोरोना काळात मंडळाला बसलेला आर्थिक फटका आणि डिझेल दरवाढीमुळे एसटीचे प्रवासी भाडे 17.7 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महामंडळाने तब्बल तीन वर्षानंतर दरवाढ केली आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार साधी जलद व रात्री सेवेसाठी प्रति टप्पा 9.7 रुपयांची वाढ करण्यात आली असून निम आराम व शयन आसनी सेवेसाठी प्रति टप्पा 12.85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवशाही सेवेसाठी प्रति टप्पा 13. 35 रुपये तर शिवनेरी सेवेसाठी 19.50 रुपये प्रति टप्पा दर आकारण्यात येणार आहे.

रातरानी सेवेच्या संदर्भात देखील महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अतिरिक्त दर रद्द करण्यात आले आहेत. दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचे तिकिट दर सारखेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असणार नवे दर

मार्ग दर – साधी – रातराणी – निमआराम – शिवशाही

सोलापूर ते पुणे – 365 – 365 – 500 – 545

पंढरपूर ते पुणे – 315 – 315 – 425 – 465

अक्‍कलकोट ते पुणे – 425 – 425 – 580 – 635

अकलूज ते परेल – 470 – 470 – 640 – 700

प्रशासनाकडून भाडेवाढीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मंगळवार (ता. 26) पासून नव्या तिकीट दराप्रमाणे दर आकारले जाणार आहेत.- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीची भेट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळीची भेट देखील घोषित करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयाची दिवाळी भेट दिली जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली असून प्रत्येक महिन्याला सात तारखेला होणारा पगार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबरला केला जाणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एसटी बसभाडेवाढ

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

October 25, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

आनंदाची बातमी! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार; एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

October 27, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026

कामाची बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपयांपर्यंतची मदत?; संकटात मदतीचा हात, सरकारची विशेष योजना

October 23, 2026
शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026
Next Post
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 28, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा