mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही, महायुतीची वाढली चिंता; महाविकास आघाडीला मात्र दिलाशाचा अंदाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 2, 2024
in राज्य, राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळेल, भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळतील असे सर्वेक्षण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दिले असले तरी मोदींच्या या विजयात महाराष्ट्राची अपेक्षित साथ नसेल, असेही चित्र समोर आल्याने राज्यातील सत्तारुढ महायुतीची चिंता वाढली आहे.

महायुतीच्या समर्थकांना मोदी सत्तेत येत असल्याचा आनंद आहे तर महाराष्ट्रात माघारल्याचे दुःख असणार. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या समर्थकांना केंद्रात इंडिया आघाडीची कामगिरी फारशी समाधानकारक नसणार याची खंत असेल आणि महाराष्ट्रात चांगले यश मिळत असल्याचे समाधान नक्कीच असेल.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणाचा विचार केला तर एक्झिट पोलने दोघांनाही कुठे ना कुठे सुखावले आहे आणि दुखावलेही आहे. अंदाज खरे ठरले तर… महायुतीत सर्वांत मोठा पक्ष भाजप असेल तर महाविकास आघाडीत उद्धव सेनेला सर्वाधिक जागा मिळतील.

एक्झिट पोलचे अंदाज महाराष्ट्रापुरते खरे ठरले तर पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मविआचे मनोबल नक्कीच वाढलेले असेल. एक्झिट पोल प्रमाण मानले तर

मोदींची देशात असलेली लाट महाराष्ट्रात नव्हती, येथे स्थानिक मुद्दे आणि जातीय समीकरणांनी बऱ्याच ठिकाणी प्रभाव टाकला असे दिसत आहे. महायुती महाविजयापासून वंचित राहणार असे चित्र आहे.

४१ प्लसचे स्वप्न दूरच ?

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने २३ तर एकत्रित शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. या युतीला ४१, राष्ट्रवादीला चार, काँग्रेसला एक आणि एमआयएमला एक आणि काँग्रेस- राष्ट्रवादी समर्थित एक अपक्ष अशा जागा मिळाल्या होत्या.

कालच्या एक्झिट पोलच्या आधारे विश्लेषण केले तर महायुतीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन ४१ चा आकडा गाठू या भाजपच्या स्वप्नांना तडे जाताना दिसत आहेत.

बारामतीत काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला चारपैकी एकही जागा मिळणार नाही किंवा फारतर एक किंवा जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असे एक्झिट पोलने म्हटले आहे. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकतील आणि सुनेत्रा पवार हरतील या निष्कर्षामुळे अजित पवार गटाची चिंता नक्कीच वाढली असेल.

पसंती मूळ पक्षांनाच?

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना सहानुभूती मिळाल्याचे त्यांना मिळत असलेल्या जागांवरून दिसते. दोन्ही पक्षांच्या फाटाफुटीत मतदारांनी फुटून बाहेर पडलेल्यांपेक्षा मूळ पक्षांना अधिक पसंती दिल्याचेही जाणवत आहे.

शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचा किती फायदा झाला याचे आत्मचिंतन करावे लागणार आहे. सांगलीत काँग्रेस बंडखोर अपक्ष विशाल पाटील बाजी मारताना दिसत आहेत. काँग्रेसला यावेळी खूपच चांगले यश मिळताना दिसत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! ‘या’ साला नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र; मुख्य माहिती आयुक्तांकडून कार्यवाहीच्या सरकारला सूचना

November 1, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

कामाची बातमी! राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?

November 1, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; ‘या’ कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

November 1, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या खात्यात काही दिवसात पैसे…’; शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं मोठं यश

October 31, 2025
शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

October 31, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

महाविकास आघाडीच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल; मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय

October 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

ब्रेकिंग! लाडकी बहिण योजनेची e-KYC पुन्हा सुरु; आदिती तटकरेंनी सांगितली ‘ही’ शेवटची तारीख, अंतिम मुदत जाहीर

October 30, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

उत्सुकता! पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज; सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडणार? जाणून घ्या…

October 29, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
Next Post
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

आनंदवार्ता! राज्यात मान्सून 'या' दिवशी दाखल होणार; नागरिक प्रचंड उष्णतेने त्रस्त; मान्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना मिळणार दिलासा

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिका निवडणूक इच्छुकांचा घाम काढणार! प्रस्थापित घराणी भिडणार ? कदम, जगताप असणार तगडे प्रतिस्पर्धी; आ.आवताडेंची भूमिका ठरणार महत्वाची

November 1, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! ‘या’ साला नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र; मुख्य माहिती आयुक्तांकडून कार्यवाहीच्या सरकारला सूचना

November 1, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

कामाची बातमी! राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?

November 1, 2025
बोराळे व दामाजीनगर गणातून रामचंद्र सलगर शेठ यांना वाढता प्रतिसाद; संत दामाजीनगर गटातून असणार प्रबळ दावेदार

बोराळे व दामाजीनगर गणातून रामचंद्र सलगर शेठ यांना वाढता प्रतिसाद; संत दामाजीनगर गटातून असणार प्रबळ दावेदार

November 1, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; ‘या’ कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

November 1, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या खात्यात काही दिवसात पैसे…’; शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं मोठं यश

October 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..