टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या दक्षिण काशी (हालमत काशी) या पवित्र भूमीत येत्या मंगळवारी दि.२१ ऑक्टोबर रोजी श्री महालिंगराया व बिरोबा गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य पालखी भेट सोहळा होणार आहे.

या दिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांतील लाखो भाविक हुलजंतीत येण्यास सुरुवात झाली आहे. श्री महालिंगरायाला नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा मंगळवारी आहे.

तसेच हुन्नूरचा श्री बिरोबा या गुरु-शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला पार पडतो. त्याआधीच्या रात्री म्हणजेच २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजता महालिंगराया मंदिराच्या पंचशिखरावर मुंडास (ध्वज) बांधण्याचा सोहळा होईल.

यावेळी शंकर-पार्वती कैलासातून येतात, अशी लोकधारणा असून याप्रसंगी देवाची मूक भाकणूक होते, असे मानले जाते. ही अद्भुत पारंपरिक श्रद्धा आजही अबाधित आहे.

गुरू-शिष्याचा भेट सोहळा मंगळवारी मुख्य दिवशी दुपारी ३ वाजता हुलजंतीच्या हालहळ्ळ अर्थात दुधाच्या ओढ्यात श्री बिरोबा व महालिंगराया पालखी भेट सोहळा होईल.

ढोल-नगाऱ्यांच्या गजरात, भंडाऱ्याच्या वर्षावात, लोकर, भंडारा, खोबरे, खारीक यांची उधळण करतात.

श्री बिरोबा व महालिंगराया या गुरू-शिष्यांची दिव्य पालखी भेट होते. नंतर मानाच्या पालख्या महालिंगरायाच्या पालखीला भेट देतात.

परंपरेचा गौरवशाली वारसा
महालिंगराया हे हालमत परंपरेतील सिद्ध पुरुष मानले जातात. बाराव्या शतकातील दगडी मंदिराचे भव्य बांधकाम या देवस्थानचे प्राचीनत्व अधोरेखित करते. श्री महालिंगरायांनी समाजजागृतीसाठी कर्तृत्वाचे दाखले दिले.

आपले गुरू बिरोबांची सेवा हा त्यांच्या भक्तीचा केंद्रबिंदू होता. प्रपंच करून परमार्थ कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण महालिंगरायांच्या चरित्रामधून समजते.

जत हुलजंती धार्मिक संबंधांचा सेतू
हुलजंती यात्रेच्या मुख्य दिवशी देवाच्या नैवेद्याचा मान जत येथील डफळे संस्थानिक राजघराण्याला असतो. ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. पूर्वी हुन्नूर व हुलजंती या दोन्ही देवस्थानांचा संबंध जत संस्थानाशी होता. त्यामुळे जत-हुलजंती धार्मिक नाते अतूट राहिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














