टीम मंगळवेढा टाईम्स
महाराष्ट्राने २०२५ पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २ मधून ७ हजार मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उदिदष्ट ठेवले आहे.
राज्यातील ३० टक्के कृषी वीजवाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.
वीजखरेदीचा खर्चही कमी होईल. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा मोठा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दरही कमी होणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषिपंप व मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनांची अंमलबजावणी व पाहणीसाठी कर्नाटक राज्याच्या ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता,
कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार पाण्डेय, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोशन, मंगरूळू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक डी. पद्मावती यांनी कृषी सौर ऊर्जा प्रकल्पांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक पंकज तगलपल्लेवार आदींची उपस्थिती होती.
या अभ्यास दौऱ्यात महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग व संजीव नेहेत, कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, विजेंद्र मुळे, समन्वयक डॉ. संतोष पाटणी आदींची उपस्थिती होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज