मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, घरगुती हिंसाचाराचा आणखी एक महिला बळी ठरली आहे. विवाहीत महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे, दीर आणि जाऊ यांच्याकडून या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून, गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चित्रा सतीश भोसले असं मारहाण झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरच्या टेंभुर्णीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रा सतीश भोसले यांना त्यांचे दीर संतोष भोसले, निलेश भोसले आणि जावा निलीता संतोष भोसले व पूजा निलेश भोसले या चौघांनी मिळून काठी व रॉडने बेदम मारहाण केली आहे,
ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर चित्रा भोसले यांना त्यांनी विष पाजण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत,
या मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा देखील फाटल्याचा आरोप चित्रा भोसले यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चित्रा भोसले यांच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
दरम्यान या प्रकरणात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 14 मे रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्यानं आरोपी फरार झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी 2007 साली झाला होता. त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला. त्यानंतर 2014 साली कुटुंबीयांविरोधात 498 कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबीयांनी चित्रा भोसले यांना नांदवण्याची लेखी हमी दिल्यानंतर त्या आपल्या सासरी आल्या होत्या.
दरम्यान आता पुन्हा त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे, दीर आणि जाऊ यांच्याविरोधात वाढीव कलम लावून अटक करण्याची मागणी वडील आणि भावाने केली आहे. चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज