टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात प्रथमच हाडांच्या, मणक्यांच्या, मेंदूच्या व किडणीच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी लागणारी मशीन गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील गरजूंना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे गजानन लोकसेवा हॉस्पिटल काही दिवसांत हायटेक झाले आहे.
प्लॅट पॅनल सी आर्म मशीन ही अत्याधुनिक मशीन या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून, दिवसेंदिवस हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांना अचूक निदान व चांगल्या सुविधा देण्यासाठी हॉस्पिटलची धडपड सुरू आहे.
मंगळवेढा व आसपासच्या तालुक्यातील ही पहिलीच मशीन आहे. अचूक शस्त्रक्रियेसाठी नागरिकांना लाभ होणार आहे.
यामध्ये कमी रक्तस्त्राव, कमी वेळेत अचूक शस्त्रक्रिया करणे आता सोपे झाले आहे. नागरिकांसाठी अत्यल्प दरात रुग्णसेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात रुग्णसेवा मिळत आहेत.
सी आर्म मशीन
हे अत्याधुनिक एक्स-रे मशीन असून शस्त्रक्रिया विभागात हे महत्त्वाचे आहे. गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे सी आर्म मशीन दाखल झाली आहे.
गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये विविध अत्याधुनिक साधनसामग्री दाखल झाल्या आहेत. यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देणे सुकर होणार आहे. डॉ.प्रवीण सारडा, संचालक , गजानन लोकसेवा हॉस्पिटल, मंगळवेढा
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज