mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Lockdown! महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, अशी आहे नियमावली; जाणून घ्या एका क्लीकवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 13, 2021
in राज्य
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात आला आहे.

31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, मात्र यात आता आणखी एका दिवसाचा भर पडला आहे.या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे.

त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली.

यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

18 वर्षांपुढील लसीकरणाला तूर्त स्थगिती

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील माहिती दिली आहे. राजेश टोपेंनी पुढे म्हटलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंंत्री जाहीर करतील.

45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल.

राज्यात रुग्ण वाढीचा दर घसरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. म्युकरमायसोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ठाकरे सरकारपुन्हा महाराष्ट्रात लॉकडाउन

संबंधित बातम्या

अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षण! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप; आता सुनावणी ‘या’ तारखेपर्यंत तहकूब

December 12, 2025
आरटीओ चा दंड आता ई-चलनाद्वारे भरता येणार; आता दंड भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

आता चिरी-मिरी देऊन सुटता येणार नाही, वाहतूक पोलिसांना ‘हा’ कॅमेरा लावला जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

December 11, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

जमिनीच्या वापरासाठी आता सनदची गरज नसणार; महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

December 12, 2025
इशारा! खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास आता पाच पट दंड होणार

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

December 11, 2025
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

RBI चा मोठा निर्णय! बँकेत झीरो बॅलन्स असणाऱ्यांसाठीही मिळणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती; सामान्य ग्राहकांना मिळाला दिलासा

December 7, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सर्व अंदाज फेल! नगपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आला

December 6, 2025

जिल्हा परिषद, महापालिकांचा बिगुल वाजण्याआधी ‘या’ निवडणुका पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

December 6, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तत्काळ मदतीकरिता कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; आता तातडीने आर्थिक मदत मिळणार

December 6, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

December 5, 2025
Next Post
ठाकरे सरकारच्या येत्या काही दिवसात ‘या’ तीन विकेट पडणार, भाजप नेत्याचा दावा

सोलापुरला दोन दिवसात औषधांचा पुरवठा सुरळीत करा, अन्यथा सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा भाजपचा इशारा

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; मंगळवेढ्यात भीषण अपघात; काळजाचा थरकाप उडवणारी बातमी; कार चालक फरार

December 12, 2025
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

मोठी बातमी! तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास; जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्वरित निलंबनाची कारवाई

December 12, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मिती केंद्रे उभारली जाणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सूचना; शासनाने नवीन धोरण केले जाहीर

December 12, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

भामटेपणाचा कहर! सिस्टीममध्ये फेरफार करून ‘या’ परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष, १ कोटी १० लाख रुपये उकळले; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार; विद्यार्थी, पालकांनो सावधान

December 12, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षण! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप; आता सुनावणी ‘या’ तारखेपर्यंत तहकूब

December 12, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

ग्रामस्थांनो! तालुक्यातील ‘इतक्या’ गावांची करण्यात येणार निवड; बीडीओ, विस्ताराधिकारी असणार मुक्कामी; मुख्यमंत्री राज्य अभियान समृद्ध पंचायत

December 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा