मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या, की स्वबळावर याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, निवडणूक लढविताना शक्य तेथे महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुतीमधून निवडणूक लढवायची की स्वतंत्र याचे संपूर्ण अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढवितानाही मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा स्पष्ट सूचना बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
‘प्रबळ’ पदाधिकाऱ्याला भाजपच्या प्रवेशाची दारे खुली
भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे. इतर पक्षातून कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे.
बाहेरून चांगला कार्यकर्ता पक्षात येत असेल तर भाजपचे कार्यकर्ते त्याला समजून आणि सामावून घेतात. यामुळेच भाजप मोठा झाला आहे.
एखाद्या ठिकाणी नाराजी येते; पण त्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि ते समजून घेतात, असेही फडणवीस म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज