टीम मंगळवेढा टाइम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील एससी, एसटी तसेच ओबीसी आरक्षण असलेल्या सदस्यांची संख्या लवकरात लवकर सादर करा, असे पत्र निवडणूक आयोग तसेच ओबीसी आयोगाने जिल्हा ग्रामपंचायत विभागाकडे पाठविले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत विभागाकडून माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने १९६० पासून सदस्यांची माहिती मागवली असून, सदर माहिती संकलित करताना ग्रामपंचायतची ‘पंचायत’ होत आहे.
ओबीसी आयोगाने मागच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर कार्यरत असलेल्या आरक्षणनिहाय सदस्यांची माहिती मागवली आहे.
ही माहिती ग्रामपंचायत विभागाकडे तयार असून आता १९६० पासूनची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुदत संपलेल्या तसेच डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची प्रभाग रचना तयार करण्याचे सुरू होते.
ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयारीला ब्रेक लावला आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय सुटल्यानंतर प्रभाग रचनेचे काम पूर्ववत करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.
त्यामुळे सध्या २११ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना स्थगित आली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी आयोग, तसेच निवडणूक आयोगाने आरक्षणनिहाय सदस्यांची संख्या मागवल्याची माहिती आहे.(स्रोत:लोकमत)
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज