टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालय येथे आरक्षण सोडत होणार आहे.
राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला.
१३ जुलै रोजी ही आरक्षण सोडत सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे. तसेच पंचायत समितीसाठी त्या – त्या तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आदेश प्रसिद्ध केले आहे . सोलापूर जिल्हा परिषदेचे गण आणि गट वाढले असून त्याची प्रभाग रचना तयार झाली आहे. त्यानंतर आता आरक्षण सोडतची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकर लागण्याची शक्यता आहे.
दि.१३ जुलै रोजी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येईल.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज