टीम मंगळवेढा टाईम्स ।
राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू नसतो हे वाक्य नेते, पुढारी यांना तंतोतंत लागू पडते. तशा पद्धतीचा त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही विचार करत निवडणुकीपुरता राजकीय विरोध झाल्यानंतर
आता दररोज एकत्र असल्याने राजकीय विरोध संपवून संपले इलेक्शन.. जपा रिलेशन अशा प्रकारचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. यातून समाजात एक चांगला संदेश दिला जात आहे.
गेल्या काही महिन्यापासून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षीय प्रचारात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहभागी होते. त्यातही निवडणुका जाहीर होऊन उमेदवार घोषित झाल्यापासून त्या नेत्यांचे पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात अग्रेसर होते.
आमचे नेते किंवा पक्ष किती चांगला आहे व विरोधी उमेदवार किंवा पक्षात किती कमतरता आहेत हे पटवून देताना कार्यकर्त्यांना जणू वादविवाद स्पर्धेत भाग घेतल्यासारखे होत होते. चौकात, नाक्यावर, कट्ट्यावर या कौतुक, आरोप, उणिवा यांच्या चर्चेच्या फैरी झडत होत्या.
अनेकदा म्हटले जाते की राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो. सर्वच पक्षांचे बहुतांश नेते, पुढारी यांचे एकमेकांशी चांगले संबंध असतात. हे विविध पक्षातील वरिष्ठ पातळीवरील अनेक नेत्यांच्या वागण्यातून दिसूनही आले आहे.
मनात कोणताही वैयक्तिक वैरभाव न ठेवता एकमेकांकडे जाणे, वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमाला जाणे हे अनेक प्रसंगातून दिसून आले आहे.
याच पद्धतीने विविध पक्षांचे बहुतांश कार्यकर्तेही निवडणुकीनंतर एकमेकांशी वैयक्तिक चांगले सौहार्दपणाचे संबंध ठेवत आहेत. गावात, शहरात सर्वच पक्षाचे पदाधिकारी.
कार्यकर्ते व्यवसाय कामानिमित्त एकत्र येतच असतात. चौकाचौकात, नाक्यावर कट्ट्यावर आताही चर्चा होतात पण त्या हसतखेळत कोणाला किती मते पडतील याची होते.
अनेकांच्या सोशल मीडियावर, स्टेटसला, सौहार्दपणाचे मेसेज पडत आहेत. राजकीय मतमतांतरे तर राहणारच पण राजकीय विरोध संपवून चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण करणारे संपले इलेक्शन जपा रिलेशन यासारखे वाक्य खरोखरच चांगला संदेश देणारे आहे.
निवडणुकीपुरते सर्वांनी आपल्या पक्षाचा, नेत्याचा प्रचार करावा. राजकीय विरोध निवडणुकीनंतर संपवून स्थानिक सर्वांनी एकत्र राहून आपले वैयक्तिक चांगले संबंध जोपासत समाजाच्या प्रगतीसाठी काम करावे असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत. (स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज