टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत.
आज सोमवारी ते मंगळवेढा तालुक्यात तर मंगळवारी पंढरपूर तालुक्यात सभा घेणार आहेत अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
पंढरपूर मतदारसंघ मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये थेट लढत होत असल्याने देशातील पाच राज्याच्या निवडणुकां सोबत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला भाजप कडून आमदार प्रशांत परिचारक,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख,आमदार गोपीचंद पडळकर माजी मंत्री तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब भेगडे, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, माजी मंत्री राम शिंदे , आमदार सचिन कल्याणशेट्टी,
आमदार राम सातपुते, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उमेश परिचारक, समाधान आवताडे यांच्यासाठी मतदारसंघात ठोकून आहेत. त्यांना रयत क्रांतीचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, बळीराजा संघटनेचे माऊली हळणवर, प्रा येताळा भगत, संघटक शशिकांत चव्हाण यांची साथ आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सभा झाल्या कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल पंढरपूर दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन गेले भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना भेटीगाठी घेत परिचारक गट फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
भागिरथ भालके साठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पंढरपूरात तळ ठोकून होते पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रणिती शिंदे , माजी आमदार दीपक साळुखे , प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष काका साठे हे मतदारसंघात ठाण राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता पंढरपूर मंगळवेढा दौ – यावर येत आहेत.
त्यांच्या मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी तीन अशा सहा सभा होणार आहेत , अजित पवारांच्या सभा नंतर आता फडणवीस यांच्या सभेकडे लक्ष लागून राहिले असून महाविकास आघाडीच्या सरकारवर त्यांची तोफ धडाडणार आहे.
पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची माहिती आहे.
या निवडणुकीत विठ्ठल सहकारी कारखाना मंगळवेढ्याच्या ३५ गावच्या पाण्याचा मुद्दा सर्वाधिक गाजला आहे, भाजप उमेदवार आवताडे यांनी सुरुवातीला विरोधकांवर कोणतीही टीका न करता विकासाच्या मुद्द्यांवर जनतेसमोर गेले, नंतर मात्र दामाजी कारखान्याच्या अपप्रचार झाल्याने ते संतापले उत्तर देताना विरोधकांचे आरोप खोडून काढत भालके यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.
विठ्ठल कारखाना, अर्जुन बँक , पंढरपूर शहराचा विकास, एमआयडीसी , रोजगार , उद्योग यावरून भागिरथ भालके यांना लक्ष केले.
आज ‘या’ गावात होणार सभा
आजसोमवारी ते मंगळवेढा तालुक्यात बोराळे येथे सकाळी नऊ वाजता, नंदेश्वर येथे सकाळी दहा वाजता, डोंगरगाव येथे अकरा वाजता आणि मंगळवेढा शहरात दुपारी पावणे बारा वाजता येथे सभा घेणार आहेत
तर मंगळवारी पंढरपूर तालुक्यात कासेगाव येथे दुपारी तीन वाजता, गादेगाव येथे दुपारी चार वाजता आणि पंढरपूर शहरात टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणावर सायंकाळी पाच वाजता वाजता सभा घेणार आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज