टीम मंगळवेढा टाईम्स ।
लातूर शहरातील गंजगोलाईत एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १० ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. दरम्यान, या बहुचर्चित खून प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीमावर्ती तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक भागात मंगळवेढा एका गावातून मंगळवारी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील गंजगोलाई परिसरात १० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी सुलतान गफार कुरेशी (रा. शहावली मोहल्ला, लातूर) याने पैगंबर हाजीमलंग सय्यद (२८, रा. बाभळगाव ता.लातूर ह.मु, अंजली नगर, लातूर) या मित्रासोबत शुल्लक कारणावरून वाद झाला.
याच वादातून पैगंबर सय्यद याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात गुरनं. ६५३/२०२४ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी सुलतान कुरेशी हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आरोपीच्या अटकेचे आदेश दिले. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सायबर सेलचे गणेश साठे, संतोष देवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मंगळवेढा तालुक्यात एका खेड्यातून अटक…
खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून, स्थागुशाचे विशेष पोलिस पथकाने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावात धडकले. सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपी सुलतान गफार कुरेशी याला मंगळवारी अटक करण्यात आली. गुन्हा घडल्यापासून वास्तव्याची ठिकाणे बदलणाऱ्या आरोपींच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या.
हैदराबाद, बीदर, बीड, सोलापुरात घेतला शोध…
पोलिस पथकाकडून फरार आरोपी वास्तव्य करण्याची शक्यता असलेल्या हैदराबाद, बिदर, सोलापूर, उदगीर, बीड शहरात शोध घेण्यात आला. दरम्यान, आरोपी कोणत्याही नातेवाइकांच्या संपर्कात नसल्याने शोध लागत नव्हता.
आरोपीशी संबंधित अनेकांची चौकशी करण्यात आली. तो महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती सोलापूर परिसरात दडी मारल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज