मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै व ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या मुदतीत विलंब
शुल्कासह आज १८ जूनपर्यंत अर्ज करता येईल. बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.
यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या
आयटीआय ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज करावे. पुरवणी परीक्षेबाबत अधिक माहिती https://www.mahahsse board.in या वर दिली आहे.
दहावीची मुदत संपली
जुलै व ऑगस्टमध्ये दहावीचीही पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ७ ते १६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत मिळाली होती. ती संपली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज