मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
जमिनीची नोंद धरणावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला वैतागून नंदेश्वरच्या शेतकऱ्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव सोशल मीडियावर स्टेटसला ठेवत
मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयात अंगावर तेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने महसूलच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.
आंधळगाव महसूल मंडलमधील नंदेश्वरमधील समाधान मोटे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणांकडून रद्द करण्यात आली. ज्या कारणास्तव रद्द करण्यात आले त्यातील दुरुस्ती शेतकऱ्याने करण्याचा प्रयत्न केला
त्यानंतर त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरून संबंधित शेतकऱ्याने काल गुरुवारी दुपारच्या दरम्यान
मंगळवेढा तहसील कार्यालयात अंगावर तेल ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु महसूल मधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्दैवी घटना टळली.
शेतकरी नोंद घ्या म्हणून दबाव टाकत होता
संबंधित शेतकऱ्यांचे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे, अद्याप त्याचा निकाल नाही, तरीही शेतकरी नोंद घ्या म्हणून दबाव टाकत होता.- मदन जाधव, तहसीलदार मंगळवेढा
माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत
गेल्या तीन वर्षांपासून माझ्या जमिनीची नोंद होत नाही. मी संबंधित अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवुन अक्षरशः थकलो आहे. माझ्या जमिनीचा नोंदी संदर्भात विचारले असता तलाठी मंडळ अधिकारी मला दुसरीच उत्तरे देत आहेत.
या प्रकरणामुळे मला खूप नाहक त्रास झाला आहे. त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करून तहसीलदारांच्या समोर वैतागून आत्महत्या करण्याचा विचार केला. माझे म्हणणे किती खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत.- समाधान मोटे शेतकरी, नंदेश्वर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज