टीम मंगळवेढा टाईम्स ।
घराच्या बंद दरवाजाची कडी तोडून कपाटातील लॉकर तोडून सोने, चांदी दागिने व रोख रक्कम मिळून ४४ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना कात्राळ (ता. मंगळवेढा) येथे घडली आहे.
कात्राळ येथील सिद्धाराम सदाशिव वालेकर यांच्या घराच्या बंद दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवण्यात आलेले २० हजारांचे सोन्याचे बोरमाळ, १५ हजारांचे सोन्याचे बदाम, १ हजारांचे पैंजण व आठ हजाराची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
ही घटना ४ ते ५ जून दरम्यान सकाळी ७ पर्यत घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक निंबाळकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार तुकाराम कोळी यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज