मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार आयपीएस प्रशिक्षणार्थी नयोमी साटम यांनी घेतला असून मंगळवेढ्यातील अवैध धंद्याची पाळेमुळे शोधून नष्ट करणार आहे. मंगळवेढ्यातील सामान्य जनतेच्या मनात पोलीसांविषयी अभिमान वाटावा असे काम करणार आहे.
मी कुणाच्याही दबावाला जुमानणार नाही, माझ्या पद्धतीनेच मी काम करून कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणार असल्याची माहिती त्यांनी ‘मंगळवेढा टाईम्स न्यूज’शी बोलताना दिली.
मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वरवडे-फळसेवाडीची व मुंबई बोरीवली (पूर्व) येथे स्थायिक असलेल्या नयोमी साटम या २०२१ आर.आर. बॅचच्या अधिकारी आहेत, त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरता सोलापूर जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली आहे.
मंगळवारी दुपारी त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार घेतला आहे. १९ जून ते ९ सप्टेंबर पर्यंत त्या मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणार आहेत.
यावेळी बोलताना साटम म्हणाल्या, प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर पोलीस दिसेल, गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ते पूर्णपणे बंद करण्यात येतील.
अती आत्मविश्वास नडला
मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या बदलीसाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेकडेही तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. अण्णा आसबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे त्यांची नियंत्रण कक्षात पुढील आदेश होईपर्यंत बदली झाली आहे.
‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार?
पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्यासह पोलीस ठाण्यातील आणखी दोन तीन कर्मचाऱ्यांची नावे आंदोलनकर्त्यांनी सांगितले होते. त्यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते, हे येणाऱ्या एक-दोन दिवसात समजणार आहे.
चौकाचौकात फटाके फोडून आनंद व्यक्त
कर्नाटकातून येणाऱ्या राज्यभर अवैध व्यवसायिकासाठी मंगळवेढा हे प्रवेशद्वार असल्यामुळे यापूर्वी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना याचा फटका बसला. रणजित माने यांच्या बदलीचे आदेश झाल्याचे समजताच मंगळवेढा राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकाचौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
..निदर्शनास आणून दिल्यानंतर माने यांच्या बदलीचे आदेश
उच्च न्यायालयाने नागरिकांवरील दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यावर चौकशी करून कारवाई का झाली नाही याबाबत पोलीस प्रमुखांना खुलासा मागितल्यानंतर सर्वपक्षीयांनी वाढलेले अवैद्य व्यवसाय सामान्य जनतेशी अधिकाऱ्याची बोलण्याची पद्धत या गोष्टी पोलीस महानिरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माने यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. – प्रतिक किल्लेदार शहराध्यक्ष, शिवसेना
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज