टीम मंगळवेढा टाईम्स।
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आज मंगळवार दि.24 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता खोमनाळ येथे इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
खोमनाळ येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक प्रतिष्ठान यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन श्री.कामसिद्ध मंदिरासमोरील मैदानात हा कार्यक्रम होणार आहे.
सदर कीर्तनासाठी महिला भगिनींना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या कीर्तनावेळी नामवंत तबलावादक आणि गायक उपस्थित राहणार आहेत. या कीर्तनासाठी खोमनाळ गावातील व परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत.
इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे.
राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक प्रतिष्ठान व खोमनाळ ग्रामस्थांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज