टीम मंगळवेढा टाईम्स न्युज ।
एस.एम खटावकर मॉल हा मंगळवेढेकरांचा ब्रँड झाला असून आनंद खटावकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात खटावकर मॉलच्या शाखा स्थापन कराव्यात असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले आहे.
एस.एम खटावकर मॉलच्या ग्रँड ओपनिंग सोहळ्याचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होते.
व्यासपीठावर धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई शिवाजीराव काळुंगे, सुनंदाताई बबनराव आवताडे, अंजलीताई समाधान आवताडे, प्रणितीताई भागीरथ भालके, तेजस्विनीताई सुजित कदम, अश्विनीताई राहुल शहा, कोमलताई साळुंखे-ढोबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदीजन व परिसरातील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की, 1968 सालापासून आजपर्यंत हा व्यवसाय खटावकर परिवाराने अखंडपणे सुरू ठेवला आहे. ग्राहकांच्या विश्वासावर मॉल सुरू करून एस.एम खटावकर मॉल ग्राहकांच्या मनात ब्रॅड म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
इतर मॉल पेक्षा खटावकर मॉल येत्या काळात मोठया नावारूपाला येणार असून खटावकर मॉलच्या शाखा संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात निर्माण व्हायला पाहिजेत. इतका मोठा सोहळा इतर कुठेही पहिला नाही असे म्हणून खटावकर मॉलला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी आनंद खटावकर यांनी केले त्या बोलताना म्हणाल्या की, 1968 साली खटावकर कुटुंबाची किराणा व्यवसायात प्रदार्पण केले. सुरवातीचा काळ व आत्ताचा काळात व्यवसाय कसा वाढत गेला याविषयी प्रास्तविकपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी तर आभार आयुष आनंद खटावकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक किल्लेदार, रामानुज मर्दा, आयाज शेख व खटावकर मॉलचे सर्व कर्मचारी प्रयत्न करत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज