टीम मंगळवेढा टाईम्स।
पत्नीला नांदविण्यासाठी पाठवणार नाही. तिचे दुसरे लग्न लावून देणार आहोत असे सांगून वारंवार फोन करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून
तिचा पती राजेश बाळू शिंदे (वय २५, रा. खडकी ता.मंगळवेढा) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेश दुर्योधन काळे, मिथुन दुर्योधन काळे, वैशाली दुर्योधन काळे (सर्व रा.औसारी ता.इंदापूर) या तिघाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी दिलमाबाई बाळू शिंदे (वय ६५, रा. खडकी) यांचा मयत मुलगा राजेश बाळू शिंदे (वय २५) याला त्याचे मेव्हुणे तथा
वरील आरोपी सुरेश काळे, मिथुन काळे, पत्नी वैशाली काळे आदींनी वारंवार फोन करुन पत्नी वैशाली हिस आम्ही नांदवण्यास पाठविणार नाही, तिचे दुसरीकडे लग्न करुन देणार आहोत,
तु आमचेकडे यायचे नाही, आलास तर बघ असे म्हणून शिवीगाळी, दमदाटी करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून त्याला आत्महत्येस दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता आत्महत्येस प्रवृत्त केले.
मयताने राहते घरी दोरीच्या सहाय्याने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे दिलमाबाई शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज