टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील नंदेश्वर येथे जयसिंग माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा
आज मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक नंदेश्वर ग्रामपंचायतीचे सदस्य काशिलिंग करे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आता सर्व बँकिंग सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
नंदेश्वर येथे जयसिंग माऊली महिला पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा आज सकाळी दहा वाजता होणार आहे.
श्री.बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती श्री.बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून या सोहळ्यास आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत,
दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांचेसह नंदेश्वर गावातील प्रमुख नेतेमंडळी, विविध संस्थांची पदाधिकारी, दूध संस्थांचे चेअरमन, विविध पक्षांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नंदेश्वर येथील नेताजी कळकुंबे दुकानाशेजारी कार्यक्रम होणार असल्याची माहिती काशिलिंग करे यांनी दिली आहे.
दामदुप्पट योजना
जयसिंग माऊली महिला पतसंस्थेने ग्राहकांना दामदुप्पट फक्त 6 वर्षात करून दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेकडे कल जास्त पाहण्यास मिळत आहे.
मोबाईल बँकिंग, नेटवर्किंग, NEFT/RTGS/ IMPS आदी सर्व सुविधा
मोबाईल बँकिंग, नेटवर्किंग, NEFT/RTGS/ IMPS, विविध ठेव योजना, विविध कर्ज योजना, QR कोड सुविधा तसेच लखपती ठेव योजना, कन्यारत्न ठेव योजना आदी सर्व योजना जयसिंग माऊली महिला पतसंस्थेमध्ये सुरू आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज