टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून जेसीबी ऑपरेटर तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोरीने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना मंगळवारी (दि. १७) सकाळी ११:३० च्या सुमारास कटफळ (ता. सांगोला) येथील फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली.
संजय भगवान केदार (वय २५, रा. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश संजय पाटील (रा. गाडीं, ता. पंढरपूर) यांनी खबर दिली आहे.
गार्डी येथील फाटे याच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर (चालक) म्हणून कामास होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११:२७ च्या सुमारास संजयने स्वतःच्या मोबाइलवरून मालक फाटे यांच्या मोबाइलवर फोन करून माझे एका मुलीवर प्रेम आहे,
ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून त्याने फोन बंद केला. त्यानंतर संजयने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशनही पाठविले.
त्यानंतर फाटे व त्यांचा मित्रांनी मिळून संजयला शोधत त्याने पाठविलेल्या लोकेशनवर गेले. कटफळ शिवारातील दुधाळवाडी फॉरेस्टमध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली.
दोघांनी आजूबाजूला शोध घेत असता, फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ एका पळसाच्या झाडाला संजय दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यांनी संजय यास खाली उतरून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे सांगितले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज