टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत सर्व गावामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या योगदानामुळे कोविड प्रतिबंधक लसीकरण व इतर सर्व वैद्यकीय सेवा या अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहेत.
हे आरोग्य केंद्र मंगळवेढा तालुक्यासाठी आज ख-या अर्थाने आरोग्य मंदिर असून जनसंजीवनी अभियान अंतर्गत या केंद्रांस सर्वांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन शिर्के हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ.शरद शिर्के यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जन संजीवनी या उपक्रमांर्तगत आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी डॉ.शरद शिर्के हे बोलत होते.
यावेळी आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.शुभांगी शिंदे, सादिक रोंगीकर , आरोग्य सहाय्यिका धनश्री कुलकर्णी , वर्षादेवी तांबाळकर, आरोग्य सेवक दत्तात्रय माने ,मनोहर पाटील , सुनिल जाधव , रणजीत लेंडवे, सुरेश होनमाने, आरोग्य सेविका गौरी कांबळे, परिचर शरद गुंजेगावकर , भिष्मा ननवरे ,आशा आदी उपस्थित होते.
जन संजीवनी या उपक्रमासाठी अकरा हजार रुपयांची देणगी
यावेळी शिर्के हाॕस्पिटल यांच्या सौजन्याने आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच डॉ.शिर्के यांनी जन संजीवनी या उपक्रमासाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली.
शिर्के हॉस्पिटलच्या वतीने सर्व सामान्य जनतेचे आरोग्य मंदिर असणाऱ्या आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास सहकार्य केल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सुविधा सक्षम व अद्ययावत करण्यासाठी जन संजीवनी या उपक्रमांसाठी विविध सामाजिक संस्था व पदाधिकारी यांचे चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज