टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील जंगलगी वि.का.सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे गटाने वर्चस्व मिळवले आहे.
या निवडीनंतर चेअरमनपदी यशवंत मलकारी चौखंडे, व्हा चेअरमनपदी श्रीकांत आण्णाप्पा तेलगाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यानंतर सदर संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य यांचा यथोचित सत्कार जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे उपस्थित होते . संचालक म्हणून रेवाप्पा चौखंडे , सूर्यकांत चौखंडे , धोंडाप्पा चौगुले , बिळयाणी चौखंडे,
सिध्दाप्पा चौखंडे संजय चौखंडे , कमलाबाई चौखंडे , बसवनिंगव्वा कस्तुरे , यलाप्पा बनसोडे , निर्मला चौखंडे यांची अविरोध निवड झाली आहे.
नूतन सदस्यांचा सत्कार करतेवेळी मल्लिकार्जुन पाटील भाऊसाहेब , आण्णाप्पा तेलगाव , रंगाप्पा चौखंडे , आमसिद्ध चौखंडे , महादेव चौखंडे , रंगराव चौखंडे,
सोमनाथ तेलगाव , विजय भोसले , माऊली कोंडूभैरी , सचिन गडेकर , शरद गोसडे , प्रमोद सावंजी आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज