टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी साखर कारखान्याचे सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन समाधान आवताडे यांनी दिवाळी साठी सभासदांना साखरही शिल्लक ठेवली नाही म्हणून आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केला होता.
मग सध्या वाटप सुरू केलेली दामाजी कारखान्याचे शिक्के असलेली साखरेची पोती कोठून आली?
दहा हजार क्विंटल शिल्लक ठेवलेली साखर गुपचूप 32 रुपये किलोने विकण्याचा सत्ताधारी संचालक मंडळाचा डाव होता,
तो डाव काही शेतकऱ्यांनी स्वतःगोडावूनची पाहणी करून हाणून पाडला असल्याचा दावा संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक अशोक केदार यांनी केला आहे.
केदार पुढे बोलताना म्हणाले की, साखर शिल्लक असतानाही वाटप नाही याची चर्चा तालुकभर सुरू झाल्याने चौकाचौकात सभासद हे संचालक मंडळ व चेअरमन यांना जाब विचारू लागल्याने नाइलाजास्तव यांना साखर बाहेर काढावी लागली,
त्यामुळे यांचे पितळ उघडे पडले केवळ थापा मारून सत्तेवर आलेल्या दामाजीच्या सत्ताधारी मंडळाचा कारभार 31 मार्चला आर्थिक निकषातून समजेल असा घनाघात दामाजी कारखान्याचे बिनविरोध संचालक अशोक केदार यांनी अवताडे शुगरच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात बोलताना केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज