पंढरपूर : राजेंद्र फुगारे
उजनी उजवा कालवा तसेच वसाहत यासाठी भूसंपादित शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढणेचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर यांचे अधिनस्त उपविभागीय अधिकारी, भीमा विकास उपविभाग क्र.४, श्रीपूर व क्र.२, पंढरपूर, उजनी कालवा उपविभाग क्र.५२,

मंगळवेढा व पाटबंधारे उपविभाग, सांगोला हे उपविभाग येत असून यांचे कार्यक्षेत्रातील भूसंपादीत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढणेचे आवाहन करणेत आले.
या विभागीय कार्यालयाकडे उजनी उजवा कालवा कि.मी. १ ते १३२ व त्यावरील सर्व वितरीका तसेच

सांगोला तालुक्यातील १४ ल.पा. तलाव, वसाहती व इतर प्रयोजनासाठी संपादित केलेल्या शासकीय भूसंपादित जमिनीवर कृषी / वाणिज्य /रहिवासी व इतर अतिक्रमण केलेचे कार्यक्षेत्रावर आढळून येत आहे.

सदर अतिक्रमण दि.३०/११/२०२५ पुर्वी तात्काळ काढून घेणेत यावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर यांनी केलेले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












