कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण मंदिर समितीच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
मात्र सद्या राज्यात सुरु असलेल्या पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणूकीच्या आचार संहितेची यामध्ये अडकाठी येण्याची शक्यता आहे.
: – नीता ढमालेंच्या उमेदवारीने बदलतील पुणे पदवीधर मतदार संघाची राजकीय समीकरणे?
असे असले तरी निवडणूक आयोगाकडून शासकीय महापूजेसाठी मान्यता घ्यावी, असा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे.
:- शेतकऱ्यांनों लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही
त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.
:- यंदा कार्तिकी वारीवर कोरोनाचे सावट! जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
सद्या राज्यात पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्याअनुषंगाने आचारसंहिता लागू आहे.
याच दरम्यान दि. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकदशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे या एकादशी सोहळ्यास श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचे निमंत्रण मंदिर समिती व जिल्हाप्रशासनाकडून उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.
मात्र निवडणूक आयोग मान्यता देणार का? हा प्रश्न असल्याने शासकीय महापूजेला एक प्रकारे आचारसंहितेची अडकाठीच आल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिर राज्य सरकारने भाविकांना दर्शनाकरीता खूले केले आहे. दररोज दोन हजार भाविक ऑनलाईन बुकींग करुन दर्शनाला लाभ घेत आहेत.
मंदिर प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर योग्य ती खबरदारी घेवून दर्शन व्यवस्था करण्यात आली असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कार्तिकी यात्राही जिल्हा प्रशासनाकडून निर्विघ्नपणे पार पडेल, अशी भावना वारकरी सांप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज