टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे पिकाला पाणी देण्याच्या कारणावरून सागर रामचंद्र रणे (वय 20 वर्षे) याच्या हातावर कोयत्याने मारून जखमी केल्याप्रकरणी परमेश्वर ज्ञानोबा रणे, ज्ञानोबा दगडू रणे या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सागर रणे व त्याचे वडील हे दि.15 रोजी दुपारी 3.00 वा. त्यांच्या शेतातील पिकाला पाणी देत असताना आरोपीने फिर्यादीजवळ येवून तु या शेतात पाणी दयायचे नाही,
शेत माझे आहे असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांचे हातातील कोयत्याने डाव्या हाताच्या पंजाला मारून जखमी केले.
तर फिर्यादीचे वडीलांना आरोपीने काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवून शेतातील पाण्याचा चेंबर व मोटारीचा स्टार्टर फोडून नुकसान केल्याचे दिलेल्या फिर्यादीत सागर रणे यांनी म्हटले आहे.
अधिक तपास पोलिस नाईक दयानंद हेंबाडे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज