मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना खासगी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर हद्दीत घडली. हनुमंत दिलीप गुजले (वय ३४, रा. भोसे, ता. मंगळवेढा) असे मयत झालेल्या वीज कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल बुधवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हुन्नूर गावच्या हद्दीत इंगोले यांच्या शेताजवळ विजेचे काम करण्यासाठी हनुमंत दिलीप गुजले हा विजेच्या खांबावर चढला होता. त्याला भगीरथवरून वीजपुरवठा केलेल्या विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.
यानंतर नातेवाईक व प्रशिक्षणार्थी पोलिस निरीक्षक नयोमी साटम यांनी पाहणी केली. मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास लागल्याशिवाय मृतदेह जागेवरून हलवण्यास नातेवाइकांनी विरोध केला. यावेळी साटम यांनी नातेवाइकांची समजूत काढून मृतदेह भोसे येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.
नातेवाईकांकडून संताप
उपकार्यकारी अभियंता बाळू चोरमले व निंबोणी शाखेचे शाखा अभियंता आसबे हे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर नातेवाइकांनी सदर कामासाठी खांबावर चढण्यासाठी कोणी प्रवृत्त केले व या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याचे सुमारास हुन्नूर परमिट घेतले होते का? आदी कारणांवरून प्रश्नांची सरबत्ती करत याच्या मृत्यूला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न नातेवाइकांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला. यावेळी महावितरणच्या निरीक्षकाकडून याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज