मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात व्यवसायाची क्षमता आणि संधी ही सर्वोत्तम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे देशहितास प्राधान्य देऊनच गुंतवणूकीस प्रोत्साहन देतात, असे प्रतिपादन ‘टेस्ला’चे सहसंस्थापक आणि उद्योजक इलॉन मस्क यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोहोचले. जॉन एफ केनेडी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी तेथे उपस्थित भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. विमानतळावरून पंतप्रधान हॉटेल लोटे न्यूयॉर्क पॅलेसमध्ये पोहोचले.
येथे त्यांनी टेस्लाचे सहसंस्थापक आणि ट्विटरचे मालक एलोन मस्क यांच्यासह नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान अशा २४ व्यक्तिमत्त्वांची भेट घेतली.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर टेस्लाचे इलॉन मस्क यांनी भारताच्या उद्योगस्नेही धोरणाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, नजिकच्या भविष्यात टेस्ला भारतात गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात व्यवसायाची क्षमता आणि संधी ही सर्वोत्तम आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे देशहितास प्राधान्य देतात. त्यांच्या मनात प्रत्येकवेळी देशातील नागरिकांच्या भल्याचा विचार असतो. या विचारास प्राधान्य देऊनच ते गुंतवणूकीस प्रोत्साहन देतात, असे मस्क यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे भारतात यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत टेस्लाच्या कारखान्याविषयी सकारात्मक निर्णय होईल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांनी बौद्ध लेखक प्रोफेसर रॉबर्ट थर्मन, निबंधकार-सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रोफेसर नसीम निकोलस तालेब, खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक नील डीग्रास टायसन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर आणि गुंतवणूकदार रे डालिओ यांचीही भेट घेतली.
खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डी ग्रासे टायसन आणि पंतप्रधानांनी युवकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याबाबत चर्चा केली. भारतीय अंतराळ मोहीम आणि या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवरही चर्चा झाली. बौद्ध लेखक रॉबर्ट थर्मन यांनी पंतप्रधानांशी भारताच्या बौद्ध वारशावर चर्चा केली. यादरम्यान जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बौद्ध धर्माच्या भूमिकेवरही चर्चा करण्यात आली.
शैक्षणिक अभ्यासक प्रा. नसीम निकोलस तालेब यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतातील तरुणांच्या समस्यांवर चर्चा केली. त्यांनी त्यांचे एक पुस्तकही पंतप्रधानांना भेट दिले.
अमेरिकन गुंतवणूकदार आणि लेखक रे डॅलिओ यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. दोघांनी भारतातील गुंतवणूक वाढविण्याबाबतही चर्चा केली. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनी पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत भारतीय शहरांच्या शाश्वत विकासावर भर दिला. तंत्रज्ञानाच्या प्रचाराबाबतही दोघांनी चर्चा केली.
ट्विटरचे माजी मालक जॅक डॉर्सी यांच्या भारतात ट्विटर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या कथित धमकी दिल्याच्या दाव्यास फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, स्थानिक सरकारांचे नियमांचे पालन करण्याशिवाय ट्विटरला पर्याय नाही. जर ट्विटरने स्थानिक सरकारच्या कायद्यांचे पालन केले नाही तर ट्विटरला संबंधित सरकारे बंद करतीलच, असेही मस्क यांनी म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज