mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारत-पाकिस्तान आज महामुकाबला; कुणाचं पारडं जड?, अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 23, 2025
in राष्ट्रीय
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला होत आहे. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज रविवार दि.२३ फेब्रुवारीला हा सामना होत आहे. दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल.

त्याआधीच भारतासाठी मोठी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

भारत-पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आशिया कपमध्ये १९ सप्टेंबर २०१८ रोजी आमनेसामने आले होते. त्यावेळी भारतीय संघानं ८ विकेट्सनं विजय मिळवला होता.

त्यावेळी पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच भुवनेश्वर कुमारनं त्यावेळी ७ ओव्हरमध्ये अवघ्या १५ धावा दिल्या होत्या आणि तीन विकेट्स घेतल्या होत्या.

केदार जाधवने तीन विकेट्स, जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मानं ५२ धावांची तुफानी खेळी केली होती.

तर शिखर धवनने ४६ धावा कुटल्या होत्या. दिनेश कार्तिकने नाबाद ३१ धावा, अंबाती रायडूनं नाबाद ३१ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता.

दुबईत २३ सप्टेंबर २०१८ रोजी पुन्हा हे दोन्ही देश सुपर फोरमध्ये समोरासमोर उभे ठाकले होते. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना सात विकेट्स गमावून २३७ धावा केल्या होत्या. शोएब मलिकने ७८ धावांची सुरेख खेळी केली.

त्या सामन्यात पुन्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन चमकले. रोहितने नाबाद १११ धावा, तर शिखर धवनने ११४ धावा चोपल्या होत्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला ९ विकेट राखून नमवलं.

दुबईत लय भारी रेकॉर्ड

दुबईत जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा विजय हा भारतीय संघाचा झाला. तर एकूण वनडे सामन्यांत पाकिस्तानचं पारडं जड आहे. दोन्ही देशांत एकूण १३५ वनडे लढती झाल्या. ५७ वेळा भारतानं, तर ७३ सामन्यांत पाकिस्ताननं विजय मिळवला आहे. ५ सामने अनिर्णित राहिले.

पाकिस्तानसाठी करो या मरो

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी हा सामना करो या मरो असाच आहे.

पण भारतीय संघ विजयी लयीत आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आव्हान असणार आहे. भारताविरुद्ध पराभव झाल्यास यजमान पाकिस्तानच चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाद होईल.

भारतीय संघानं पहिल्याच सामन्यात बांगलादेशला हरवलं होतं. पाकिस्तानला धूळ चारली तर, टीम इंडियाचं सेमिफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होईल. पाकिस्तान संघ पराभूत झाला तर, त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळेल.

पाकिस्तान संघाविरुद्ध रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता खूप कमी आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघ जायबंदी असलेल्या फखर जमांच्या जागेवर इमाम उल हकला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप जाधव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ११ – बाबर आझम, सउद शकील, मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, सलमान अली आगा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, अबरार अहमद, हारिस रऊफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तानमॅच

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
Next Post
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

शिक्षकांमध्ये रंगलाय 'माझ्या नवऱ्याची बायको' चा खराखुरा एपिसोड; आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षिकेने केलंय म्हणे भलतंच कांड; सोलापूर जिल्ह्याशीही कनेक्शन?

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 18, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 18, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 18, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा