मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. जखमींनाही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिताला एकूण ५००० रुपये मिळणार आहेत. यातील ३५०० हजार रुपये थेट पीडित व्यक्तीला मिळणार आहेत. तर १५०० रुपये आरोग्य सुरक्षा ट्रस्टला दिले जाणार आहेत.

वरिष्ठ काँग्रेस नेते, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी तामिळनाडूमध्ये कुत्रा चावणे आणि रेबीजने मृत्यू होणाऱ्या घटनेवर चिंता व्यक्त केली होती.

तामिळनाडूमध्ये भटके कुत्र्यांनी आतापर्यंत ५.२५ लाख लोकांवर हल्ले केले आहेत. तर यात २८ लोकांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ चिदंबरम यांनी दिला होता.

श्वानप्रेमीचा अर्थ भटक्या कुत्र्यांना पकडणे आणि नसबंदी करणे आणि लसीकरणाला विरोध करणे असा नव्हे, असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं.

चिदंबरम यांनी पुढे म्हटलं होतं की, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की, लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची पुन्हा सुटका करण्यात येणार आहे. लसीकरणाचा अर्थ कुत्र्यांना मारणे, असा होत नाही.

खरंतर श्वानप्रेमींनी कोर्टाचा आदेश लागू करण्यासाठी मदत करायला हवी. कोर्टाचा हा निर्णय विशेष म्हणजे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे’.

तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी सर्व राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय, खेळाचे मैदान, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते.

कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की, पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















