टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 149 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 145 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज कोरोना चाचणीचे 2 हजार 292 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 143 अहवाल निगेटिव्ह आले असून 149 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 51 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 12 हजार 12 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
इन्स्टट्युन्शल क्वारंटाईनमध्ये तीन हजार 97 जण आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 35 हजार 889 झाली आहे.
आतापर्यंत 1 हजार 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 634 ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागातील 33 हजार 208 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पंढरपूर तालुक्यातील पुळूजवाडी येथील साठ वर्षिय पुरुष व करमाळा तालुक्यातील मांगी येथील 75 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज