टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
आज सकाळी 7 वाजता ट्विट करत त्यांनी आयकर विभागाकडून भुजबळांची 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग (इन्वेस्टिगेशन) मार्फ़त सेशन कोर्ट मुंबईत दावा दाखल करत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती देखील मिळत आहे. किरीट सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सोमय्यांचा दावा
मंगळवारी इन्कम टॅक्स विभागाने प्रेसनोट जारी केलीय. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, जी संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सेशन कोर्टमध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना 7 वर्षापर्यंतची सजा होऊ शकते, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
या सगळ्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘मंगळवारी इन्कम टॅक्स विभागाने प्रेसनोट जारी केलीय. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे,
जी संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती. सेशन कोर्टमध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना 7 वर्षापर्यंतची सजा होऊ शकते.(स्रोत:tv9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज