mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये उर्वरित ५ मंडळाचा समावेश करा; आ.आवताडे यांनी प्रशासनाला धरले धारेवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 8, 2023
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यामध्ये पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी उर्वरित मरवडे, मंगळवेढा, भोसे, बोराळे आणि पाटखळ या ५ मंडळामध्ये असणाऱ्या

शेती क्षेत्राचीही सर्वेक्षण करण्याची मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मागणी केली असता त्यांच्या या मागणीवर वास्तविक परिस्थितीची माहिती घेऊन लवकरात-लवकर याद्या तयार करुन कार्यवाही सुरु करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

सदर पत्रामध्ये आ.आवताडे यांनी नमूद केले आहे की, मंगळवेढा तालुक्यामध्ये खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी तीन महसूल मंडळात २१ दिवसांचा अखंड असल्याने पीक विमा सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

परंतु एकूण आठ मंडळांपैकी पाच मंडळाचे सर्वेक्षण अद्याप बाकी आहे. सर्वेक्षण न झालेल्या मंडळामध्ये खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची पाण्याअभावी अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली असून त्या पिकांनी अक्षरशः माना टाकलेले आहेत.

अशा पिकांतून कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. सर्वेक्षणास पात्र असणाऱ्या या मंडळामध्ये देखील पावसाचे प्रमाण अगदी नगण्य असून ३ मिमी पडलेला पाऊस दिवस गणल्यामुळे या कारणांनी खंड ब्रेक झालेला आहे.

मंगळवेढा तालुक्यामध्ये बाजरी, तूर व कापूस पिकांसाठी मंडळ अधिसूचित असून कांदा व मका या पिकांसाठी तालुका अधिसूचित आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यामध्ये महसूल मंडळ निहाय पाठीमागील काही दिवसांमध्ये केवळ ४.०० मिमी च्या आत असा अत्यल्प पाव झाल्याने खंड ब्रेक झालेला आहे.

परंतु ती परिस्थिती पाहिली असता सर्वच पिके सुकून गेलेली असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा लक्षात घेऊन प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे

नुकसानीच्या निकषांमध्ये अत्यल्प पावस हा पाऊस दिवस ग्राह्यंना धरता २१ दिवसांचा कालखंड समजून तालुक्यातील पाच मंडळाचा या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्याची मागणी आमदारा आवताडे यांनी लावून धरली होती.

आमदार आवताडे यांनी केलेल्या या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या पाच मंडळांची सदर विषयाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत माहिती संकलित करून लवकरात- लवकर या सर्वेक्षणाच्या दिशेने याद्या तयार करण्याच्या सूचना आदेशित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी आमदार आवताडे यांना दिले आहे.

दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या खाईत लोटलेल्या जनतेला माय-बाप सरकारची सकारात्मक भूमिका घेऊन सत्तेतील सरकार हे जनतेच्या मदतीला धावून येत आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने महत्वपूर्ण असणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत दक्षिण भागातील रेवेवाडी, पडळकरवाडी, लोणार, महमदाबाद हु, हुन्नूर, शिरनांदगी, मारोळी,

बावची, पौट, सलगर बु, सलगर खु, लवंगी, आसबेवाडी, येळगी, सोड्डी, शिवणगी या गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून पाणी सोडण्याची मागणी आ आवताडे यांनी या बैठकीत केली असता तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भागामध्ये सदर योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दक्षिण भागातील दुष्काळग्रस्त जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली नियोजन मंडळाने ज्या पद्धतीने टंचाई मधून पाणीपट्टी देण्याचे ठरवले आहे अगदी त्याचपद्धतीने या योजनेसाठी टंचाई मधून पाणीपट्टी देण्याबाबत यावेळी चर्चा घडवून आणण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पाणी सोडण्याबाबत पत्र देत असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्येही तसे पत्र देण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेशीत करण्यात आले आहे.

त्याचबरोबर चंद्रभागा नदीच्या पाण्यावर मंगळवेढा शहर व पंढरपूर शहर मधील अवलंबुन असणाऱ्या भागाला नदीच्या कमी पाणीपातळीचा खूप मोठा फटका बसत असत असल्याचेही आ आवताडे यांनी या बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे. सर्व दुष्काळग्रस्त परिस्थितीचा अंदाज घेतल्यास मतदारसंघातील पशुपालकांना आपले पशुधन जगविणे जिकरीचे झाले आहे.

त्यामुळे पशुधनाचा संवेदनशील मार्गाने विचार करुन लवकरात-लवकर चारा छावण्या व चारा डेपो सुरु करण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी आ आवताडे यांनी केली. आ आवताडे यांच्या सदर मागणीचा विचार करुन व परिस्थितीचा आढावा घेऊन छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदय यांनी दिले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील खटावकर मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील खटावकर मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट; पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

February 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा