मंगळवेढा टाईम्स न्युज।
अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा बुधवारी मुंबई विमानतळावर होणार आहे. शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येणार आहेत.
मुंबईहून येणारे विमान सलग दोन्ही दिवस फुल्ल असून पहिल्याच दिवशी प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई विमानतळावरील कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून पहिली फ्लाईट सोलापूर विमानतळावर येणार आहे. प्रवासी विमानतळावर दाखल झाल्यानंतर कंपनीकडून सर्वच प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे.
विमानाच्या स्वागताला नाशिक ढोल- पथक असेल. सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे अनोख्या पद्धतीने वेलकम करण्यात येणार असल्याचे स्टार एअर कंपनीकडून सांगण्यात आले.
सोलापूर-मुंबई विमानसेवेचा बुधवारी शुभारंभ होत असल्याने स्टार कंपनीकडून बुकिंग काउंटरही सुरू करण्यात आले आहे. शिवाय विमानतळावर स्टार कंपनीचे ब्रॅंडिंगही करण्यात आले आहे.
तिकीट विक्रीस चांगला प्रतिसाद…
१५ ऑक्टोबर रोजी सोलापूर ते मुंबईसाठी फ्लाईट फुल्ल झाली आहे. १७ रोजीही ४० हून अधिक जणांनी बुकिंग केले आहे. २८ ऑक्टोबर रोजी ३५ तर, २९ ऑक्टोबर रोजीही ४५ जणांनी बुकिंग केले आहे. मुंबई ते सोलापूरसाठी पहिले दोन्ही दिवस प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
वेळेत बदल करण्याची मागणी
मुंबईहून सोलापूरला व सोलापूरहून मुंबईला जाण्याच्या दोन्ही वेळा सोलापूरकरांसाठी गैरसोयीच्या आहेत. मुंबईत काम करण्यासाठी व मुंबईतून काम उरकून परत येण्यासाठी फ्लाईटची वेळ गैरसोयीची आहे.
यामुळे मुंबईला जाण्यासाठी सकाळची तर परत सोलापूरला येण्यासाठी सायंकाळी फ्लाईट उपलब्ध झाल्यास मोठा प्रतिसाद मिळेल, अशी मागणी सोलापूरकरांची आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज