टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील रत्नदीप कॉम्प्लेक्स येथे प्रगती केक शॉपचा आज उद्घाटन सोहळा सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती संचालक प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास शाळा वेबसिरिज फेम अनुश्री माने व रमा लांजेकर तसेच युट्युबस्टार गणेश शिंदे व फॅमिली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ब्रॅण्ड माँजिनीजन
वाढदिवसाच्या पलीकडे नववर्ष, गेट टुगेदर, लग्न, साखरपुडा, निवृत्ती समारंभ अशा कोणत्याही भारतीय समारंभात मूळचा नसलेला केक कापण्याचा सोहळा सहज जोडला गेला.
‘गो अहेड,सेलिब्रेट’ ही टॅगलाइन त्यांनी सर्वार्थाने सार्थ केली. आज केकसाठी अधिक चांगले, चवदार केक ब्रॅण्ड्स किमान शहरी भागात आहेत, पण उपलब्धता आणि पोहोचण्याची क्षमता याबाबतीत माँजिनीजला पर्याय नाही.
लांबवरूनही दिसणारे जांभळ्या गुलाबी रंगातील माँजिनीजचे केक शॉप्स केकच्या खवय्यांना हमखास आवडीच्या चवी मिळणार, याची ग्वाही देतात.
सध्याचं आपलं सगळं जगणंच उत्सवी होतंय. पूर्वी वर्षांचा वाढदिवस साजरा होणं मुश्कील होतं आणि आज बाळाचा महिन्याचा वाढदिवसही साजरा होतो.
हा मधला टप्पा पार करताना आपल्या सोबत असणारे जे ब्रॅण्ड्स आहेत, त्यातला गोड क्रीमी ब्रॅण्ड म्हणजे माँजिनीज. जगण्यातलं सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन करत जगणं दोन्ही साजरा करणारा!
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज